Parents protest outside Nath Valley School after students were beaten by a sports teacher in a shocking incident captured on video. Saam Tv
Video

आधी कपडे उतरवले, नंतर अमानुष मारहाण, क्रीडा शिक्षकाचे विद्यार्थ्यांसोबत अमानवी कृत्य|VIDEO

Nath Valley School Incident: नाथ व्हॅली शाळेत क्रीडा शिक्षकाने विद्यार्थ्यांना कपडे काढून अमानुष मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच पालकांत संतापाची लाट उसळली असून शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगरमधील नाथ व्हॅली शाळेमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील क्रीडा शिक्षक अनिल देवरे यांनी चार ते पाच विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे या मुलांना कपडे काढून मारले गेले असून, संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.या प्रकारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अनेकांनी शाळेच्या प्रशासनाकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारींची गंभीर दखल घेत शाळा प्रशासनाने तत्काळ चौकशी सुरू केली. चौकशीनंतर दोषी आढळलेल्या क्रीडा शिक्षक अनिल देवरे यांची शाळेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर शहरात शिक्षण संस्थांमधील शिस्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या शारीरिक शिक्षेवर तात्काळ प्रतिबंध घालण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT