Sinnar Assembly SaamTv
Video

Exit Poll Maharashtra : सिन्नर विधानसभेचे संभाव्य आमदार कोण असणार? पाहा Exit Poll

Saam Exit Poll : राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात सिन्नर विधानसभा मतदारसंघात लढत रंगली. यात अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांना संभाव्य आमदार म्हणून पसंती मिळण्याची शक्यता आहे.

Saam Tv

सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात लढत रंगली आहे. याठिकाणी अजित पवार गटाकडून माणिकराव कोकाटे हे उमेदवार आहेत. तर शरद पवार यांच्या गटाकडून उदय सांगळे यांना उमेदवारी मिळाली आहे.

काल झालेल्या मतदानानंतर सकाळने केलेल्या सर्वेक्षणातून संभाव्य आमदार म्हणून पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांचं नाव समोर आलं आहे. सिन्नर मतदारसंघात या दोन्ही उमेदवारांनी जातीय समीकरण जुळवत आपला आपला गड राखण्यासाठी प्रयत्न केला आहे. मात्र सिन्नर शहराचं राजकारण व्यक्ती केंद्रित असल्याने मतदारांचा कल हा माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने झुकतांना बघायला मिळाला आहे.

प्रचारासाठी यावेळी अजित पवार यांनी या भगत जेवढे दौरे केले त्या प्रत्येक दौऱ्यात माणिकराव कोकाटे यांना मंत्री पद देण्याबाबत वक्तव्य केलं. त्यामुळे देखील सिन्नरच्या विकासासाठी संभाव्य आमदार म्हणून माणिकराव कोकाटे यांच्याकडे पाहिलं जात आहे. या सगळ्या परिस्थितीचा फटका मात्र सिन्नरमध्ये शरद पवार यांच्या गटाला बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT