Scene from Pune’s Khardpudi village where a couple was attacked over inter-caste marriage, sparking shock and outrage Saam Tv
Video

Pune News: सैराट स्टाईल हल्ला, पतीला मारहाण तर पत्नीचे...; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं|VIDEO

Sairat-Style Honour Crime: पुण्यातील खेड तालुक्यात सैराट शैलीतील धक्कादायक घटना घडली आहे. अंतरजातीय विवाह केल्यामुळे पत्नीचे अपहरण तर पतीला बेदम मारहाण झाली.

Omkar Sonawane

पुणे: जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी गावात सैराट चित्रपटातील प्रसंगाची आठवण करून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून, २८ वर्षीय विवाहितेचे अपहरण करून तिच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, ही घटना विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी या दांपत्यावर घडली असून, दोघांनी अंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहामुळे संतप्त झालेल्या पत्नीच्या कुटुंबीयांनी थेट त्यांच्या घरी जाऊन हल्ला केला, अशी प्राथमिक माहिती आहे.

या प्रकरणी प्राजक्ताच्या भावासह तिच्या आईसह १५ जणांविरुद्ध खेड पोलीस स्टेशनमध्ये जबर मारहाण व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस तपास सुरू असून, घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. प्राजक्ताचा थांगपत्ता लागत नसून, पोलिसांनी तिला शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकार कर्ज मुक्ती कधी करणार? उद्धव ठाकरेंचा शासनाला रोखठोक सवाल

Kidney Health: किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT