Tuljapur Saam TV
Video

Tulja Bhavani : तुळजाभवानी मातेची तलवार गहाळ, पुजाऱ्यांचा गंभीर आरोप | VIDEO

Tulja bhavani Temple : तुळजाभवानी मंदिरातील खजीना खोलीतून शस्त्र पूजनाची तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला आहे.त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुळजाभवानी मंदिरातील खजिना खोलीतून शस्त्र पूजनासाठी वापरली जाणारी विशेष तलवार गहाळ झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक पुजाऱ्यांनी केला असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पुजाऱ्यांच्या मते, पद्मश्री गणेश द्रविड शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या तलवारीचे विधीवत पूजन करण्यात आले होते. त्यांनी तलवारीमध्ये शस्त्रातील तत्त्व आणि देवीची शक्ती संचारित केली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्यामुळे ही तलवार केवळ धार्मिकच नव्हे, तर अध्यात्मिकदृष्ट्याही अत्यंत महत्वाची मानली जाते.तलवार खजिना खोलीतून नेमकी कशी गायब झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, गायब झालेली तलवार तात्काळ देवीच्या चरणी परत आणण्यात यावी, अशी जोरदार मागणी पुजाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT