तो झुंझार खेळला, हार्ड हिट्स मारले..टीम इंडियाच्या बॉलर्सला अक्षरश: गुंडाळलं होतं, भारतीयांचा श्वास या क्लासेननं रोखून ठेवला. एका क्षणासाठी भारतानं सामना गमावला होता. पण हिटमॅनच्या एका निर्णयानं हा सामना साऊथ आफ्रिकेच्या हातातून खेचून आला आणि झुंझार खेळी करणाऱ्या क्लासेनची बॅट रोहितने थांबवली. क्लासेन हा साऊथ आफ्रिकेचा दमदार खेळाडू म्हणून ओळखला जातो. सनरायझर्स हैदराबादमधील त्याची खेळी ही अविस्मरणीय आहे. तीच स्ट्रॅटेजी त्यानं इथं वापरली आणि झुंझार खेळीनं टीम इंडियावर अटॅक करण्यास सुरूवात केली. अगदी बॅटिंगमध्ये भरभरून कौतुक करणाऱ्या अक्षर पटेललाही त्यानं गार केलं.अक्षर हा फिटकीपटू असला तरी क्लासेनने करारा जवाब देत टीमला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. अक्षर पटेलच्या १५ ओव्हरमध्ये त्यानं सिक्स आणि चौके मारत एकूण २४ धावा केल्या... आता भारताला सगळं अवघड होऊन बसलं होतं. पण क्लासेनच्या या खेळीला रोहित शर्मानं चांगलंच पारखलं आणि जसप्रीत बुमराहकडे पुढची जबाबदारी दिली.
जसप्रीतनं वेगवान बॉलिंग करत त्याला हादरवून सोडलं..पण त्याला विकेट घेता आला नाही... अखेर रोहितने त्याचा अत्यंत जवळचा आणि ऑलराऊंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुकमी एक्क्याला बाहेर काढलं. हार्दिकला १७ वी ओव्हर दिली. यावेळी हार्दिकनं आपली स्ट्रॅटेजी वापरली. पहिल्याच बॉलमध्ये क्लासेनची विकेट पाडली आणि त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. क्लासेनने २७ बॉलात ५२ धावा काढल्या आणि हार्ड हिटच्या नादात तो विकेट पाडून बसला. त्यामुळे रोहित शर्माला त्याला थांबवण्यात यश मिळाला आणि तो क्लासेनपेक्षा वरचढ ठरला. कोणताही कांगावा न करता. रोहित शर्मानेही कॅप्टन कूलसारखीच कामगिरी केली आणि टीम इंडियाला ट्रॉफी मिळवून देण्यात तो यशस्वी ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.