Sushant Singh Rajput Saam TV
Video

Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीला कोर्टाची नोटीस! | VIDEO

Rhea Chakraborty : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीला कोर्टानं नोटीस बजावली आहे. सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा रियावर आरोप आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दंडाधिकारी न्यायालयाकडून नोटिस बजावण्यात आली आहे. रियाने दाखल केलेल्या तक्रारीचा तपास बंद करण्यासंदर्भात सीबीआयने आपला अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यावर सुनावणी दरम्यान कोर्टाने रियाला नोटिस पाठवून तिची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. सुशांतच्या आत्महत्येसाठी रिया चक्रवर्तीने त्याला प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. या पार्श्वभूमीवर रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि चौकशीही सुरू करण्यात आली होती.

रिया चक्रवर्तीने यापूर्वी सीबीआयकडे आपल्या बाजूने काही तक्रारी व पुरावे दिले होते. मात्र, तपास यंत्रणांनी ती तक्रार बंद करण्याची शिफारस न्यायालयात केली होती. आता न्यायालयाच्या आदेशानंतर रिया काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : वृश्चिक राशीसाठी तिप्पट लाभाचा महासंयोग, मकर-मीन राशीत प्रेमाचा वर्षाव; जाणून घ्या तुमचे भविष्य

ठाकरेसेनेचा पुन्हा पोपट मेला, ठाकरेसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

SCROLL FOR NEXT