Deputy CM Eknath Shinde interacting with civic officials to ease rules for Ganeshotsav Mandals in Mumbai Saam Tv
Video

Ganesh Mandals Mumbai: गणेशोत्सव मंडळांवरचं विघ्न टळलं; एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर मोठी घोषणा, VIDEO

Eknath Shinde: मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यावर खड्डा खोदल्यास महापालिकेचा १५ हजार रुपयांचा प्रस्तावित दंड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवला.

Omkar Sonawane

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मंडप उभारणीच्या वेळेस रस्त्यावर खड्डा खणल्यास महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या दंडात वाढ होणार होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळेत हस्तक्षेप करत गणेशभक्तांना दिलासा दिला आहे.

मुंबई महापालिकेकडून मंडप उभारणीदरम्यान खड्डा खणल्यास तीनपट दंड म्हणजेच १५ हजार रुपये आकारण्याचा प्रस्ताव होता. याविरोधात गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर शिंदे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, २०१७ पासून लागू असलेला मूळ दंड म्हणजेच दोन हजार रुपयेच कायम ठेवण्यात यावा. त्यामुळे महापालिकेच्या नव्या प्रस्तावित दंडातून गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू, साताऱ्यातील दुर्दैवी घटना

Yellow Saree Designs: हळदीला नेसा पिवळ्या रंगाची साडी, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Matar Paratha Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी मटार पराठा, वाचा सोपी रेसिपी

Liver damage symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा लिव्हर हळूहळू होतंय खराब

Cancer Tests: कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखून करा 'या' चाचण्या, नाहीतर...; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT