समुद्रकिनारी थरारक दृश्य अनुभवायला मिळालं आहे. समुद्रावरून किनाऱ्याकडे सरकणाऱ्या काळसर ढगांची प्रचंड लाट पाहून काही क्षण लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. हे दृश्य इतकं भयानक होतं की बघणाऱ्यांना क्षणभर वाटलं, जणू त्सुनामीच येत आहे. आकाशातून जमिनीवर झेपावणाऱ्या ढगांनी काही काळ किनाऱ्यावर गडबड उडवली होती. अनेकांनी धावपळ करत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ही त्सुनामी नव्हे तर हवामानातील एक दुर्मिळ नैसर्गिक घटना होती. याला ‘रोलिंग क्लाउड’ किंवा ‘शेल्फ क्लाउड’ असं म्हणतात, जे गरम आणि थंड हवेमधील टोकाच्या बदलामुळे निर्माण होतं. हे दृश्य पाहून अनेकजण थक्क झाले असून, या निसर्गाची करामत अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर हा थरारक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, निसर्गाच्या अकल्पित रूपाची ही आठवण अनेकांच्या मनात घर करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.