पुणे शहरात आवश्यक परवाना नसतानाही रॅपिडोकडून बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सेवा बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही सेवा सुरू राहिल्याने आरटीओने रॅपिडोच्या ऑपरेटर कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच बाईक टॅक्सीचा पर्याय ॲपमधून हटवण्याची मागणीही प्रशासनाने केली आहे.
रॅपिडो कंपनीकडे पुण्यात बाइक टॅक्सी चालवण्याचा परवाना नाही. अॅग्रीगेटर लायसन्स नसतानाही रॅपिडोकडून बाइक टॅक्सी व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. विनापरवाना बाइक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आदेश दिले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाइक टॅक्सी चालकांवर कारवाई होणार आहे. रॅपिडो कंपनीच्या अॅपवरून बाइक टॅक्सी बुक न करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान विनापरवाना बाइक टॅक्सी आढळल्यास आरटीओकडून कारवाई केली जाणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आरटीओने आवाहन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.