beed police saam tv
Video

Ranjit kasale: निलंबित PSI रणजीत कासलेचा पाय आणखी खोलात, पोलिसांत आणखी एक गुन्हा|VIDEO

Beed Crime: बीडचे निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले हा दोन दिवसापूर्वी पोलिसांना शरण गेला, त्यानंतर त्याच्या विरोधात आता वेगवेगळ्या स्तरातून गुन्हे दाखल होत आहे.

Omkar Sonawane

सायबर विभागातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले चे नवनवीन कारणाने समोर येत आहेत. अशातच रणजीत कासलेच्या विरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुधीर छगनराव चौधरी यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर चौधरी हे अंबाजोगाई येथे कुणाल एंटरप्राइजेस नावाने एनर्जी ड्रिंक ची एजन्सी चालवत आहेत. त्यांचे अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन मधील अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. याच ओळखीच्या माध्यमातून त्यांची ओळख तत्कालीन बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांच्या विरोधी वर्ण गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणजीत कासले यांनी आईची प्रकृती खालावली आहे असा बनाव करून चौधरी यांच्याकडून प्रथम विविध फोन पे नंबर वरून एक लाख रुपये घेतले यानंतर 15 एप्रिल रोजी दवाखान्याच्या खर्चासाठी रोख रक्कम लागल्याचे सांगून रेस्ट हाऊस अंबाजोगाई येथे भेट घेऊन पाच लाख रुपये कॅश स्वरूपात घेतले. हे पैसे चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या खात्यातून काढून दिले होते. यावेळी चौधरी यांच्यासोबत ऋषिकेश अण्णासाहेब लोमटे व सुरज किर्तन हे दोन मित्रही उपस्थित होते. फसवणूक झाल्या प्रकरणी चौधरी यांच्या फिर्यादीवरून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रंगीत वाचल्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT