Ramdas Kadam & Bharat Gogawale Saam TV
Video

Ramdas Kadam : "पालकमंत्री व्हायचं असेल तर मुंबई-गोवा महामार्ग नीट करा" रामदास कदम यांच भरत गोगावले यांना आवाहन | VIDEO

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीच्या प्रश्नावरून शिवसेनेचे नेते रामदास कदम आक्रमक झाले आहेत. "१५ वर्ष झाली तरी आपला वनवास संपत नाही," असा टोला त्यांनी लगावला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी संताप व्यक्त करत पालकमंत्री भरत गोगावले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. "१५ वर्ष झाली तरी आपला वनवास संपत नाही," अशा शब्दांत त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

कदम म्हणाले, "कोकण शिवसेनेचं असल्यामुळे हायवेला निधी मिळत नाही का?" असा थेट सवाल करत त्यांनी शासनाच्या दुर्लक्षावर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी भरत गोगावले यांना उद्देशून म्हटलं, "जर पालकमंत्री म्हणून खरोखरच जबाबदारी पार पाडायची असेल, तर सर्वप्रथम मुंबई-गोवा महामार्ग नीट करा."रामदास कदम यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा महामार्गाच्या कामांचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT