Raju Shetti leads a silent march in Kolhapur, demanding the return of elephant Mahadevi from Ambani's Vantara zoo. Saam Tv
Video

वनतारामध्ये प्राण्यांची तस्करी, मृत्यूही... महादेवीच्या सुटकेसाठी राजू शेट्टींचा अंबानींवर घणाघात|VIDEO

Mahadevi Elephant Transferred: कोल्हापुरात महादेवी हत्तीणीच्या सुटकेसाठी नागरिकांनी मूक मोर्चा काढला. राजू शेट्टींनी अंबानींवर वन्य प्राण्यांच्या तस्करीचा आरोप केला.

Omkar Sonawane

कोल्हापूर: वनतारा हे प्राण्यांसाठी नसून धनाढ्यांच्या दिखाव्याचं माध्यम आहे. या ठिकाणी केवळ प्राण्यांची साखळी नाही, तर त्यांची तस्करीही केली जाते, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. गुजरातमधील 'वनतारा' या खाजगी प्राणी संग्रहालयात महादेवी या हत्तीणीला हलवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून मूक पदयात्रा काढली. या आंदोलनाचं नेतृत्व करताना शेट्टी यांनी अंबानी कुटुंबीयांवर थेट आरोप केले. वनतारा तयार करताना कुठलीही अधिकृत परवानगी घेतली गेली नाही. इतकंच नव्हे, तर तिथलं हवामान प्राण्यांच्या पोषणासाठी अजिबात योग्य नाही, अशी टीका त्यांनी केली.

शेट्टी पुढे म्हणाले, अनेक प्राणी वनतारामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. अंबानी कुटुंबीयांनी अनंत अंबानी यांच्या विवाहप्रसंगी ‘मयूरी’ नावाच्या हत्तीणीला सलग तीन दिवस पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभं ठेवलं होतं. अशा ठिकाणी आमच्या महादेवीचा नीट सांभाळ होणार कशी?

कोर्टाच्या आदेशावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कोर्टाचा निर्णय अंतिम असतोच असं नाही. आम्ही महादेवीच्या दयेचा अर्ज थेट महामहीम राष्ट्रपतींकडे सादर करणार आहोत. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून महादेवीला पुन्हा कोल्हापुरात परत आणावं, ही आमची नम्र विनंती आहे, असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT