'एक देश, एक निवडणूक' च्या मंजूर झालेल्या अहवालाची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे. 'निवडणुकांचं महत्व वाटत आहे. तर आधी महानगरपालिका निवडणूक घ्या', अशी पोस्ट राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर केली आहे.
बुधवारी कॅबिनेट बैठकीत 'एक देश, एक निवडणूक' अहवालाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या अहवालावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. याबद्दल त्यांनी एक पोस्ट केली असून 'एक देश, एक निवडणूक' च्या आधी महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या. असं त्यात म्हंटल आहे. '' कॅबिनेटमध्ये मान्यता मिळाली. पण संसदेची मान्यता लागेल. प्रत्येक राज्याचा कौल विचारात घ्यावाच लागेल. या कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही. राज्याच्या अधिकारांना धक्का पोहोचू नये याची खातरजमा व्हावी. सरकार कोसळलं, विधानसभा बरखास्त झाली तर निवडणूक होणार का? लोकसभेच्या मध्यवधी लागल्या, तर सगळ्या निवडणुका परत घेणार का? निवडणुकांचं महत्व वाटत आहे तर आधी महानगरपालिका निवडणुका लवकर का घेतल्या जात नाही आहेत?'' अशा आशयाची पोस्ट ठाकरे यांनी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.