Raj Thackeray addressing MNS office bearers during the Pune meeting at Sankalp Hall, where he expressed strong dissatisfaction with their performance. Saam Tv
Video

Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पदं सोडा, राज ठाकरेंनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल|VIDEO

MNS Strategy For Upcoming Pune Municipal Elections: पुण्यात झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी कडक शब्दात फटकारले. काम करायचं नसेल तर पदं सोडा, असा इशारा देत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना जबाबदारी पार पाडण्याचे आदेश दिले.

Omkar Sonawane

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्याकडून आज पुण्यातील शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुण्यातील शाखा अध्यक्षांची बैठक पार पडली. पुण्यातील संकल्प हॉलमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी मनसेचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थितीत होते. यासोबतच शहरातील सर्व शाखा अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे स्वतः शाखा अध्यक्ष यांना मार्गदर्शन करणार होते.

बैठकीत सुरवातीलाच राज ठाकरे यांनी एका प्रमुख पदाधिकाऱ्याला त्याच्या सोशल मिडिया पोस्ट वरून फटकारले. तसेच इतर पदाधिकाऱ्यांना सुद्धा अनेक प्रश्न विचारले. मतदार याद्या तसेच पक्ष संघटनेच्या बाबत राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि शाखा अध्यक्षांना प्रश्न विचारले असता अपेक्षित उत्तरं ही समाधानकारक आणि सकारात्मक न मिळाल्यामुळे राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आणि शाखा अध्यक्षांना सुद्धा झापले. "काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा. इतके दिवस काय काम केले हे दाखवा, मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत," असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. यावेळी सुद्धा शाखाध्यक्षांनी माना खाली टाकल्या. तसेच पुढे जाऊन राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना कडक शब्दात सूचना दिल्या. "जे पदाधिकारी काम करणार नाहीत किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणार नाहीत त्यांना काढून टाका," अशा शब्दात राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

शाखाध्यक्षांची बैठक ही किमान एक ते दोन तास चालणं अपेक्षित होतं. यावेळी पुणे शहरातील विविध प्रश्न त्यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत असलेली रणनीती तसेच मतदार यादी यांच्यातील गोंधळ याबाबत सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन हा या बैठकीचा मूळ उद्देश होता. मात्र शहरातील नेत्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून निराशा जनक उत्तर मिळाल्यामुळे राज ठाकरे यांनी ही बैठक संपवून निघून जाणं पसंत केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Courtroom Drama: इमरान हाश्मीचा 'हक' पाहायला जायचा प्लॅन करताय? त्याआधी ओटीटीवर पाहा 'हे' कोर्टरूम ड्रामा चित्रपट

Maharashtra Live News Update: मरीन लाईन्स परिसरातील इमारतीला आग

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी दोघे ताब्यात, हत्येची सुपारी देणारा बडा नेता कोण?

Ind vs Aus: भारताच्या धारदार गोलंदाजीसमोर बॅटिंग ढासळली; सिरीजमध्ये टीम इंडिया आघाडीवर

Bihar Election: उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घेराव; वाहनांवर दगड, शेणफेक, बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न, मतदानावेळी तुफान राडा

SCROLL FOR NEXT