Raj Thackeray  X
Video

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Raj Thackeray यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना परवानगीशिवाय कोणाशीही बोलू नका असे आदेश दिले आहेत. राज यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Yash Shirke

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टची चर्चा पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी पक्षातील कोणीही समाजमाध्यमावर काहीही बोलायचे नाही, कोणाशी संवाद साधायचा नाही अशी सक्त ताकीद दिली आहे. राज ठाकरे यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय त्यांनी देखील कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही."

राज ठाकरे ।

राज ठाकरे यांनी ही पोस्ट का केली आहे? यामागे नेमकं काय कारण आहे? यावरुन सध्या चर्चा सुरु झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंसह विजयी मोर्चाला एकत्र आल्यानंतर केलेल्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT