Raj Thackeray  X
Video

Raj Thackeray: 'धर्म,जात न पाहता किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकाम पाडा', राज ठाकरेंचं विधान

Raj Thackeray Warns Government: छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब, पण यासोबत मोठ्या जबाबदारीचीही जाणीव आवश्यक – राज ठाकरे.

Bhagyashree Kamble

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतिक आणि महाराष्ट्राच्या मातीत रूजलेल्या किल्ल्यांचा इतिहास जागतिक स्तरावर पोहोचलाय. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झालाय. ही बाब नक्कीच महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. ही आनंदाची बातमी समजताच नेते मंडळींसह सामान्यांनी जल्लोष केला. मात्र, यावरून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सरकारचे कान टोचले. तसेच गड किल्ल्यांची परिस्थिती बदलेल अशी आशा व्यक्त केली.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

'युनेस्कोचा दर्जा मिळाल्यानंतर किल्ल्यांचं संवर्धन, संरक्षण आणि व्यवस्थापन हे जागतिक निकषांनुसार करावं लागतं. यासाठी कडक नियम असतात, ज्यांचं पालन अनिवार्य आहे. त्यामुळे किमान आता तरी हे ऐतिहासिक गड नीट संवर्धित होतील, अशी आशा आहे.

राज्य सरकारला यासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी उपलब्ध होईल आणि राज्याने देखील यासाठी भरीव निधी द्यावा. आजवर अनेक सरकारांनी या किल्ल्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या दुरवस्थेला खतपाणी घातलं, त्यामुळे हे किल्ले जगाला दाखवण्याची लाज वाटायची. आता ही परिस्थिती बदलेल, अशी अपेक्षा आहे', असं राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगलीमध्ये भीषण अपघात, कार वारणा नदीत कोसळली

konkan Fort : घोड्याच्या नालासारखा आकार असलेला किल्ला, रचना पाहून व्हाल थक्क!

Ladki Bahin Yojana: ४ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा होणार, ऑगस्टच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

Crime: मार्केटमधून घराकडे निघालेल्या महिलेसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात पोलिसाने छेड काढली नंतर...

Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

SCROLL FOR NEXT