Raj Thackeray to visit CM Devendra Fadnavis at Varsha Bungalow during Ganeshotsav Saam Tv
Video

Maharashtra Politics: राजकीय खलबतं! राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी जाणार; पडद्यामागे काय घडतंय?|VIDEO

Political implications of Raj Thackeray and Devendra Fadnavis: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर गणपती दर्शनासाठी जाणार आहेत. मात्र ही भेट केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित राहणार की यामागे राजकीय समीकरणे आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Omkar Sonawane

राज ठाकरे उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर जाणार.

भेटीचं कारण गणेशोत्सवातील दर्शन असलं तरी राजकीय चर्चा होण्याची शक्यता.

काही दिवसांपूर्वी फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी दर्शनासाठी गेले होते.

हिंदी–मराठी मुद्द्यावरून ठाकरे बंधूंची एकजूट झाल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. गणेशोत्सवानिमित्त वर्षा बंगल्यावर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी जाणार आहेत. यावेळी दोघांमध्ये काही राजकीय चर्चाही होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

राज ठाकरे यांची ही भेट केवळ गणपती दर्शनापुरती मर्यादित राहणार की त्यामागे राजकीय समीकरणे आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. गणपती स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले होते. त्यावेळी या दोघांमध्ये काही राजकीय चर्चा झाल्याचे देखील राजकीय सूत्रांनी सांगितले होते. हिंदी मराठीच्या मुद्यावरून राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याने अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत. यानंतर उद्या पुन्हा राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट होणार असून या दोघांमध्ये काय चर्चा होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसाठी सोप्या गोष्टी अवघड होऊ शकतात, पाहा राशीभविष्य

Mumbai Local Train: मुंबई लोकलचा ४ दिवस रेल्वे ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

Ganeshotsav: पुण्यात आता ‘नो लिमिट’, विसर्जन मिरवणुकीत होणार ढोल-ताशांचा जल्लोष, पथकांवरची सक्ती हटली

Friday Horoscope : कामाच्या ठिकाणी धावपळ होणार; 3 राशींच्या लोकांना आव्हाने पेलावे लागणार

Panvel Crime News: मुलीच्या गळ्यावर कोयता, पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला; जामीनावरील आरोपीचा पनवेलमध्ये धुडगूस

SCROLL FOR NEXT