राज ठाकरे मनसे  Saam Tv
Video

Raj Thackeray: चित्रपटावरून जागे झालेले हिंदू काही कामाचे नाहीत; औरंगाजेबाच्या कबरीवरून राज ठाकरे कडाडले, VIDEO

Aurangzeb tomb: छावा सिनेमा बघून सगळ्यांचे हिंदुत्व उफाळून आले आहे, यावरच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खडेबोल सुनावले आहे.

Omkar Sonawane

राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरुन काही दिवसांपासून मोठे राजकारण पेटले आहे. हे राजकारण इतके शिगेला गेले की नागपूर मध्ये दोन गटात राडा होऊन दंगल पेटली. यावरच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यामध्ये मौन सोडले असून सरकारवर कडाडून टीका केली.

राज ठाकरे म्हणाले, मराठवाड्यात देशातील अनेक जिल्ह्यात काही दिवसांपासून पाणी येत नाही. मूळ विषयाकडे लक्ष नाही. आम्हाला कशाची पडली नाही, आम्हाला पडल औरंगजेबाची तो बसला एकटा द्राक्ष खात आणि आम्ही भांडतोय. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे की उडवली पाहिजे. चित्रपटाने जागे होणारे हिंदू काय कामाचे नाहीत, चित्रपट थिएटर मधून उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान तुम्हाला आता विकी कौशल मेल्यावर कळलं? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला. व्हाट्सअपवर इतिहास वाचता येत नाही. इतिहास वाचण्यासाठी पुस्तकात डोकं घालावं लागतं. आता कोणी पण बोलायला लागलेत विधानसभेत बोलत आहे खरंतर काही काम नाही, औरंगजेबावर बोलतात माहित आहे तरी का औरंगजेब काय प्रकरण होतं असं राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

स्प्रे मारून बेशुद्ध, शेतात नेत अत्याचार अन् बांधून टाकलं; बीडमध्ये अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य | Beed News

Sabudana Laddu Recipe: श्रावणात उपवासाला झटपट बनवा 'साबुदाणा लाडू', ही रेसिपी एकदा वाचाच

Numerology Success: 'या' जन्मतारखेच्या लोकांचे बालपण संघर्षमय, पण पुढे आयुष्य बदलून टाकणारी श्रीमंती

Pune Rave Party: मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत राजकीय कनेक्शन उघड, बड्या महिला नेत्याचा पती पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT