Raj Thackeray during MNS meeting in Pune where he scolded Ramesh Pardeshi over RSS-related post. Saam Tv
Video

राज ठाकरेंनी ‘मुळशी पॅटर्न’ फेम रमेश परदेशीला सुनावलं; एकाच ठिकाणी राहा|VIDEO

Raj Thackeray Reaction To Ramesh Pardeshi: पुण्यात झालेल्या मनसे बैठकीत राज ठाकरे यांनी ‘मुळशी पॅटर्न’ फेम रमेश परदेशी यांना संघाच्या पोस्टवरून चांगलंच सुनावलं. एकाच ठिकाणी राहा असा स्पष्ट इशारा देत ठाकरे यांनी कार्यकर्त्यांपुढेच परदेशी यांना झापल्याची माहिती समोर आली आहे.

Omkar Sonawane

पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुळशी पॅटर्न फेम रमेश परदेशी यांना राज ठाकरेंनी चांगलंच सुनावल्याची माहिती समोर आली आहे. रमेश परदेशी यांनी अलीकडेच सोशल मीडियावर आरएसएसच्या संचालनाचा फोटो पोस्ट केला होता. त्या पोस्टमध्ये त्यांनी स्वतःला संघाचा कार्यकर्ता असल्याचं नमूद केलं होतं.

यावर राज ठाकरे यांनी थेट विचारलं, छाती ठोकून सांगतोस की मी संघाचा कार्यकर्ता आहे, मग आमच्याकडे टाईमपास का करतोस? एकाच ठिकाणी राहा. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या समोरच राज ठाकरेंनी परदेशी यांना झापलं,अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ‘पिट्या’ उर्फ रमेश परदेशी हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे पक्षातील वातावरण काहीकाळ तापलं होतं. मनसेच्या बैठकीत घडलेला हा प्रसंग सध्या पुण्यात राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मध्य रेल्वेवर मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

SCROLL FOR NEXT