Raj Thackeray Saam TV
Video

Mira- Bhayandar : राज ठाकरेंची तोफ आज मिरा भाईंदरमध्ये धडाडणार |VIDEO

MNS Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज मिरा भाईंदरमध्ये धडाडणार आहे.अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेल्या ठिकाणी राज ठाकरेंची सभा होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज मिरा-भाईंदरमध्ये होणार असून, या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेल्या ठिकाणीच ही सभा आयोजित करण्यात आली असून, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.

मनसेकडून या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. “मिरा-भाईंदरमध्ये वाघ येतोय” अशा आशयाची पोस्टर्स शहरात झळकली असून, मनसेच्या आक्रमक भूमिकेची झलक या प्रचारातून दिसून येतेय. काही दिवसांपूर्वी परप्रांतीय व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चा काढला होता.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज काय बोलणार, कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मनसेची पुढील रणनीती याच सभेत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : शेवटच्या क्षणी बाजी पलटली; 'बिग बॉस मराठी 6'चा स्ट्राँग स्पर्धक घराबाहेर, नाव वाचून बसेल धक्का

Monday Horoscope : गोड गुलाबी संसारात मिठाचा खडा पडणार; ५ राशींच्या लोकांना घ्यावे लागणार काळजीपूर्वक निर्णय

Bigg Boss Marathi 6 Finale: 'घरी वहिनींचा धक्का...'; ‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनालेमध्ये जिनिलिया आणि अभिषेक बच्चनची खास एन्ट्री

महिला बचत गटाच्या नावावर ५ लाखांची फसवणूक; बनावट सह्या अन् ...; |VIDEO

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

SCROLL FOR NEXT