Raj Thackeray Saam Tv
Video

Raj Thackeray: राज ठाकरेंचा फडणवीसांना पाठिंबा, संजय राऊत संतापले, VIDEO

Sanjay Raut Slams Raj Thackeray Over His Support for Fadnavis: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा काल गुढीपाडवा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. राज ठाकरे यांच्या भाषणावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.

Omkar Sonawane

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्या निमित्त सरकारवर निशाणा साधत देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देखील दिला. तुमच्या हातात एक सुसंस्कृत राज्य आहे तुम्ही चांगलं काम केलं तर त्याला आमचा निश्चित पाठिंबा आहे असे राज ठाकरे म्हटले होते. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे यांनी चांगल्या कामाची यादी जाहीर करावी कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला आणि गुन्हेगारांना पाठीशी घातलं हे चांगले काम आहे का? मुंबईमध्ये मराठी माणसाची पीछेहाट सुरू आहे महाराष्ट्रातील उद्योग बाहेर चालले आहेत आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यावर काहीच बोलत नाही हे चांगले काम आहे का? मुंबईत मराठी माणसाला घर नाकारले जात आहे. मराठी संस्कृतीवर हल्ला होत आहे हे जर चांगलं काम असेल तर जरूर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणे ही राष्ट्राची गरज आहे. असा खोचकटोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

SCROLL FOR NEXT