MNS candidate Ganesh Landge celebrates his decisive victory in Ward 21A of Kalyan-Dombivli Municipal Corporation elections. Saam Tv
Video

राज ठाकरेंचं इंजिन सुसाट! राज्यात मनसेने खातं उघडलं, 2 उमेदवारांचा दणदणीत विजय|VIDEO

Kalyan Dombivli Municipal Election: कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणूक 2025-26 मध्ये मनसेने खाते उघडत मोठा विजय मिळवला आहे. प्रभाग 21A मधून गणेश लांडगे यांचा दणदणीत विजय, मनसेसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो.

Omkar Sonawane

कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2025-26 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याणमध्ये अखेर आपले खाते उघडले आहे. पॅनल क्रमांक 7D मधून मनसेचे अधिकृत उमेदवार गणेश लांडगे यांनी प्रभाग क्रमांक 21A मधून दणदणीत विजय मिळवला आहे.

गणेश लांडगे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा 2362 मतांनी पराभव करत मनसेला कल्याणमध्ये महत्त्वाचे यश मिळवून दिले आहे. या विजयामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, कल्याण शहरात मनसेच्या राजकीय उपस्थितीला बळ मिळाले आहे.

या प्रभागात मनसेचे 2 उमेदवार विजयी झाले असून प्रल्हाद म्हात्रे यांच्या प्रचाराचा मोठा प्रभाव दिसून आला. स्थानिक प्रश्न, नागरिकांचे मुद्दे आणि संघटित प्रचार याचा फायदा मनसेला झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कल्याणमध्ये मनसेने खाते उघडल्याने आगामी राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं धक्कादायक निधन; अवघ्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update : नागपूरातील नंदनवन परिसरात होळीचा मोठा उत्साह

Holi 2026: होळी खेळताना मोबाईल फोनची काळजी कशी घ्याल?

LIC Scheme: एलआयसीची जबरदस्त योजना! महिलांना दर महिन्याला मिळणार ₹७०००; वाचा सविस्तर

Actor Family in Dubai: 'बाबा, जर काही झाले तर...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब अडकलं दुबईत; मुलगी रडत म्हणाली...

SCROLL FOR NEXT