Raj and Uddhav Thackeray seen warmly greeting each other at Sanjay Raut’s granddaughter’s naming ceremony in Mumbai’s MCA Club. Saam Tv
Video

Maharashtra Politics: राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र, यावेळेस काय ठरले निमित्त पाहा VIDEO

Thackeray Brothers Come Together: संजय राऊत यांच्या नातीच्या बारशाच्या सोहळ्यात उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र आले. दोन्ही ठाकरे बंधूंनी मनमोकळ्या गप्पा मारल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Omkar Sonawane

उद्धव आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आल्याचे दिसून आले. याला निमित्त होते ते म्हणजे संजय राऊत यांच्या नातीचं बारसं. मुंबईच्या वांद्रे येथील एमसीए क्लब येथे संजय राऊत यांच्या मुलीच्या मुलीचा बारशाचा सोहळा पार पडला. या कौटुंबिक कार्यक्रमाला दोन्ही ठाकरे बंधू उपस्थित होते. याठिकाणी हे सर्व अत्यंत मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसले. यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच या सोहळ्याला खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधु एकत्र आल्यानंतर मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यंदाच्या दसरा मेळाव्यामध्ये देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाक्याचा पुनरुच्चार केला की, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी यामुळे आगामी स्थानिक निवडणूका ठाकरे बंधु एकत्र लढतील अशी चिन्हे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये बूथ प्रमुखांचा मेळावा

Darjeeling Landslide: दार्जिलिंगमध्ये भूस्खलन,17 जणांचा मृत्यू

Pune Drink And Drive : पुण्यात अपघाताचा थरार! मद्यधुंद चालकानं दुचाकीला दिली धडक, दुभाजकावर कार चढवली

Dharma Movie: धर्मा प्रॉडक्शनचे सर्वाधिक कमाई करणारे हे ७ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा ब्राह्मण समाजाकडून गौरव; उपमुख्यमंत्र्यांना ‘समाजस्नेह पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT