Raj Thackeray, Uddhav Thackeray, and Jayant Patil lead the charge against Hindi imposition in schools; NCP backs the July 5 protest in Mumbai.  Saam Tv
Video

Marathi Morcha : राज-उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार; शरद पवारांचा हिंदी सक्तीविरोधातील मोर्चाला पाठिंबा|VIDEO

Ncp Sharad Pawar Faction Supports: राज व उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा पुकारला आहे. ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे.

Omkar Sonawane

राज्यातील शालेय शिक्षणामध्ये केंद्रसरकारने पाहिलीपासूनच त्रिभाषा सूत्र लागू केल्याने राज आणि उद्धव ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले आहे. हिंदी सक्तीच्या मुद्यावरून वातावरण चांगलच तापल असून आता मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. येणाऱ्या 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधु हे एकत्र मोर्चा काढणार आहे. आता याच मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा दिला आहे. याबबबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परिपत्रक काढत मोर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ट्विट मध्ये म्हटले आहे की, राज्य सरकार महाराष्ट्रात जी हिंदी सक्ती लादू इच्छित आहे त्याविरोधात दिनांक ५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मी करत आहे.

कुणाचाही विविध भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेलाही विरोध नाही. पण इयत्ता पहिलीपासूनचं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे. जो योग्य आहे आणि 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे. शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार.

महाराष्ट्र हिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' पक्षाचं स्पष्ट धोरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT