Raigad Saam TV
Video

Raigad Fort : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, रायगडाचा पायरी मार्ग पुन्हा खुला | VIDEO

Reopened For Tourists : पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट असेल किंवा अतिवृष्टी होत असेल तर पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू आता पायरी मार्गाच्या वापराबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेला रायगड किल्ल्याचा पारंपरिक पायरी मार्ग अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात सुधारित आदेश जारी करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.गेल्या काही दिवसांपासून रायगड परिसरात रेड व ऑरेंज अलर्ट लागू असल्यामुळे प्रशासनाने पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता, तर स्थानिक व्यावसायिकांचे व्यवसाय देखील ठप्प झाले होते.

मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून पायरी मार्ग पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर महाड तालुका पोलिसांनी रायगड किल्ल्याच्या पायरी मार्गावर लावलेले बॅरेगेटिंग हटवले.या निर्णयामुळे पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाची लाट उसळली असून, अनेकांनी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटात दगडफेक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT