Rahul Gandhi Voter Adhikar Yatra Live Bihar Politics: निवडणूक आयोगाच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. मतचोरीचा आरोप करत राहुल गांधींनी आयोगाला लक्ष केलेय. बिहारमध्ये बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत मोठं विधान केलं आहे. "मतचोरी होऊ देणार नाही" असा जोरदार इशारा देत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पाहा त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे आणि राजकीय पार्श्वभूमी.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चार महिन्यांनंतर भाजप महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकली. मतदान सर्वेक्षण आमच्या बाजूने होते, परंतु जेव्हा आम्ही याची सखोल तपासणी केली तेव्हा कळले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात लाखो मतदार जोडले गेले. त्यामुळे भाजप निवडणूक जिंकली. आता हाच प्रकार बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एसआयआरद्वारे बिहारमध्ये केला जात आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.