डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना राहुल गांधी यांनी थेट इशारा दिला आहे. या विधेयकाला काँग्रेस पूर्ण ताकदीने विरोध करणार असून, विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असं राहुल गांधी यांनी पक्षाच्या रणनीती बैठकीत स्पष्ट केल्याचं वृत्त आहे. तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी वेगळी भूमिका घेतल्यास आघाडीतील राजकीय संबंधांचा फेरविचार करावा लागू शकतो, असे संकेतही काँग्रेसने दिले आहेत.
मित्रपक्ष वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याने काँग्रेसने विशेष रणनीती आखली आहे. दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी उपस्थित होते. संबंधांवर पुनर्विचाराचा इशारा: इंडिया आघाडीतील ज्या पक्षांनी डीलिमिटेशनच्या समर्थनार्थ भूमिका घेतली, तर त्यांच्यासोबतच्या राजकीय संबंधांवर पुनर्विचार केला जाईल, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. मित्रपक्ष व संभाव्य परिणाम: डीएमके आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी वेगळी भूमिका घेतल्यास किंवा पाठिंबा दिल्यास काँग्रेस कठोर भूमिका घेऊ शकते. या घडामोडींमुळे इंडिया आघाडीत फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.