Rahul Gandhi Speech At Sangli  saam tv
Video

Rahul Gandhi News: भाजप सरकारमध्ये प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार, राहुल गांधींचा गंभीर आरोप

Rahul Gandhi At Sangli, Maharashtra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि PM मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. भाजप सरकारमध्येच सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Saam Tv

महाराष्ट्रातील सांगलीत आलेल्या राहुल गांधी यांनी राज्यातील महायुती आणि केंद्रातील भाजप सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. भाजप सरकारमध्ये प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला.

रोजगार ज्यांना हवा आहे, त्यांना आता मिळू शकत नाही. कारण ज्या कंपन्या रोजगार देत होत्या, त्या बंद झाल्या आहेत. अंबानी आणि अदानी हे देशाला रोजगार देऊ शकत नाही, रोजगार लहान उद्योजक, मध्यम उद्योग हे देऊ शकतात. भारतात नवा मॉडल आहे. चायनाचा माल येतो, तोच माल दहा बारा अब्जाधीश विकताहेत. मेड इन महाराष्ट्र, मेड इन इंडिया कुठेच दिसत नाही. नुकसान देशाच्या युवकांचा होतोय. अदानी अंबानींचा फायदा होतोय. दोन हिंदुस्थान निर्माण झाले आहेत. एक अब्जाधीश आणि एक गरिबांचा, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडलं.

एक हिंदुस्थान असायला हवा. बँकांचे दरवाजे अब्जाधीशांसाठी खुले झाले आहेत, तर बँकांचे दरवाजे गरिबांसाठीही खुले झाले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार दिसतो. रस्ते, सरकारच भ्रष्टाचारी आहे. जिथे बघाल तिथे भ्रष्टाचार पाहायला मिळेल. बाहेरचे लोक इथे येऊन कंत्राट हिसकावून घेतात. ही परिस्थिती आम्हाला बदलायची आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

SCROLL FOR NEXT