Purandar saam tv
Video

Purandar Airport: पुरंदरमध्ये ड्रोन सर्वेला विरोध; पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, सुप्रिया सुळे म्हणाल्या...VIDEO

Police Lathi-Charge on Farmers: पुरंदर तालुक्यातील सात गावात विमानतळ प्रकल्प उभारण्याची सरकार आखणी करत असून यासाठी 2832 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे.

Omkar Sonawane

विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावंपैकी एखातपूर या गावात शुक्रवारी ड्रोन सेवेला सकाळी सुरुवात झाली. मात्र, ड्रोन सर्वेक्षण सुरू होत असताना स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या जमावत तिथे येऊन ड्रोनच फोडले. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला. यानंतर गावात खळबळ उडाली. उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन दुपारी चार वाजेनंतर आणखी दोन ड्रोन कॅमेरे मागून घेतले त्याद्वारे पुन्हा ड्रोन सर्वेक्षण सुरू करून संध्याकाळी ते सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.

मात्र, त्यावेळी शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करण्यात आला. या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. पुरंदर विमानतळाचा हा जो काही विषय आहे त्यासाठी शेतकरी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे.

त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन संवेदनशीलपणे हा विषय सोडवावा ही जी काही घटना घडली. शेतकऱ्यांनी लाठीचार्ज केला, याचा मी निषेध करते. तसेच ही घटना घडल्यावर मी लगेचच पुण्याच्या ग्रामीण एसपी यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यांनीही सहकार्याची भूमिका दाखवली आहे. ते घटनास्थळी पोहोचले आहे आणि ज्या मुलांना अटक केली आहे त्यांना सोडण्यात यावे अशी माझी भूमिका आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

SCROLL FOR NEXT