Pune Khadakwasala Dam SaamTv
Video

Pune Rain: पुणेकरांचे पाण्याचे टेन्शन मिटलं! पुण्यात ४ दिवसांपासून तुफान पाऊस, खडकवासला धरणाची पाणी पातळी वाढली

Pune Khadakwasala Dam: पुण्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Priya More

पुण्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. पुण्याच्या खडकवासला धरण क्षेत्रात गेल्या ४ दिवसांपासून तुफान पाऊस पडत आहे. या धरणातून मुळामुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता खडकवासला धरणाच्या नवीन मुठा कालव्यातून ५०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला धरण क्षेत्रात गेल्या ४ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रातील चारही धरणांमध्ये पाणीसाठा वाढत असून काही प्रमाणात पाणी मुळा मुळा नदीत सोडले जात आहे.

पुण्यात २४ तासांत धरणसाखळीत ३.७८५ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या २४ तासांत चारही धरणांमध्ये मिळून ३७८५ एमसीएफटी (३.७८५ टीएमसी) पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणसाखळीतील एकूण उपयुक्त पाणीसाठा वाढून १०.६८ टीएमसी (३६.६३ टक्के) झाला असून, अवघ्या १३ तासांत २.३६ टीएमसी पाण्याची भर पडल्याने धरणांतील साठा झपाट्याने वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?

Maharashtra Drought: दुष्काळाच्या झळा! पावसाअभावी हातची पिकं जाणार; बळीराजाची स्थिती बिकट

SCROLL FOR NEXT