Rain showers bring relief to Pune as cloudy skies turn into pleasant weather across the city. saam tv
Video

उकाड्यानंतर पुण्यात पावसाची एंट्री; वातावरणात गारवा|VIDEO

Light To Moderate Rainfall In Pune City Today: पुण्यात अखेर पावसाची हजेरी लागली असून मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला असून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Omkar Sonawane

उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना अखेर दिलासा मिळाला असून रविवारी दुपारनंतर शहरात पावसाने हजेरी लावली. मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सकाळपासूनच पुणे शहरात ढगाळ वातावरण होते. दिवसभर उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र दुपारनंतर अचानक पावसाने सुरुवात केल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला. शिवाजीनगर, कोथरूड, हडपसर, पिंपरी-चिंचवडसह अनेक भागांत रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्त्यांवरील धूळ कमी झाली असून हवेत आल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावल्याचेही चित्र पाहायला मिळाले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस पुणे शहर आणि परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा कायम राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT