Pune Police arrested five accused including women who were caught stealing gold jewelry and mobile phones during the Palkhi Wari procession. saam tv
Video

Ashadh Wari: वारीच्या वेशात चोरी! पुणे पोलिसांची मोठी कारवाई; २३ तोळे सोने आणि १४ मोबाईलसह टोळीच्या आवळल्या मुसक्या|VIDEO

Palkhi Wari Robbery Foiled: पुणे पोलिसांनी पंढरपूर वारीदरम्यान चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. वारकऱ्यांच्या वेशात चोरी करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २३ तोळे सोनं आणि १४ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

Omkar Sonawane

पंढरपूरला जाणाऱ्या वारी दरम्यान काही चोरीच्या घटना घडल्या होत्या. यावर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या वेळेस वारकऱ्यांच्या वेशभूशेत घुसून चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पालखी सोहळ्यात आलेल्या भाविकांचे दागिने आणि मोबाइल चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. चोरट्याकडून 23 तोळे सोन्याच्या दगिन्यांसाह 14 मोबाइल हस्तगत करण्यात आले आहे. रिटा उर्फ गंगा नामदेव कांबळे (वय-35), चांदणी शक्ती कांबळे (वय- 32), बबिता सूरज उपाध्ये (वय- 27), गणेश विलास जाधव (वय 30, रा. सोलापूर) पूजा धीरज कांबळे (वय 35, सर्व रा. उदगीर, जि. लातूर), अशी या चोरट्यांची नाव असून त्यांच्याकडून 23 तोळे सोन्याची दागिने हस्तगत करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljapur Tulja Bhavani Mandir : तुळजा भवानी मंदिराचा गाभारा पाडणार? मंदिर जीर्णोद्धावरुन तुळजापुरात राडा

Pune Crime: पैशांची मागणी, वारंवार शिवीगाळ; तरुणीचं डोकं फिरलं, रॉडने मारहाण करत तरुणाला संपवलं

Maharashtra Politics : शिंदे - ठाकरे एकाच मंचावर येणार? काय आहे कारण?

Fact check : 'मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटो...'; काय आहे FB पोस्टमागचं सत्य? जाणून घ्या

Nail Paint: नेल पेंट लावण्याचे 'हे' दुष्परिणाम माहितीये का?

SCROLL FOR NEXT