Pune Shanivarwada News Today Saam TV News
Video

Pune News Today: शनिवारवाड्यावर बॉम्ब ठेवल्याच्या फोनने खळबळ! पुणे पोलिसांकडून तपास सुरु, बेवारस बॅगमध्ये नेमकं काय?

Pune Shanivarwada News Today: पुण्यातील शनिवार वाड्यावर आढळली बेवारस बॅग, बॅगची कसून तपासणी सुरु, पुणे पोलिसांकडून बंदोबस्तही वाढवला

Saam TV News

Pune News Today: पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या शनिवारवाड्या समोर एक बेवासर बॅग आढळून आली होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सुट्ट्यांमुळे शनिवारवाड्यावर पर्यटकांची गर्दी होत असते. अशातच शनिवार वाड्यावर एक बेवारस बॅग आढळून आल्याचं समजल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या बॅगेची तपासणी आता केली जाते आहे. बॉम्ब शोधक पथक आणि नाशक पथकही शनिवार वाड्यावर दाखल झालं असून पुढील तपास केला जातोय. सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूच्या परिसरातही कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, ही बेवारस बॅगबद्दल कळल्यांतर पुणे पोलिसांनीही सतर्क होत बंदोबस्त वाढवलाय. तसंच शनिवार वाड्यातून पर्यटकांनाही बाहेर काढण्यात आलं होतं. पुण्यातील शनिवार वाड्याच्या आवारात बॉम्ब ठेवल्याचा फोन पुणे पोलिसांना आला होता. कंट्रोल रुमला आलेल्या फोन कॉलनंतर पोलिसांनी तातडीने खबरदारीची पावलं उचलली आणि शनिवार वाड्यावर तपास सुरु केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑक्टोबर - नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

Accident : खडीने भरलेल्या ट्रकची प्रवासी बसला जोरात धडक, २० जणांचा जागेवरच मृत्यू, अनेकजण जखमी

3 November 2025 Rashi Bhavishay: करिअर अन् आर्थिक स्थिती सुधारणार, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा?

Pancreatic Cancer: तुमच्या पायात दिसतोय का 'हा' बदल? जीवघेण्या कॅन्सरची असू शकते लक्षण, तज्ज्ञांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT