Sharad Pawar Saam Tv
Video

Pune: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती गठीत, शरद पवारांच्या संस्थेचं होणार ऑडिट

Vasantdada Sugar Institute: पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होणार आहे. चौकशीसाठी ५ जणांची समिती स्थानप करण्यात आली आहे.

Priya More

शरद पवार अध्यक्ष असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. ५ सदस्य चौकशी समिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिळणाऱ्या अनुदानाच्या विनियोगाची चौकशी करणार आहेत. साखर आयुक्त संजय कोलते यांच्याकडून चौकशी समितीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ही समिती ६० दिवसांच्या आत राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या मंत्री समितीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचा निर्णय घेतला होता. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अडचणीत मित्र साथ देतील, महालक्ष्मींची कृपा राहील; ५ राशींच्या लोकांना अफाट धनसंपत्ती अन् प्रेम मिळणार

मराठीत 94 हजार विद्यार्थी नापास, मातृभाषेतच 8 टक्के मुलांची दांडी गुल

मी स्वत: वकील...; भाजपच्या विरोधात लढाई सुरू, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

2 माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंडाची शिक्षा, भ्रष्टाचाराविरोधात भारतात कडक कायदे कधी?

सुप्रिया सुळेंनी अपघात झाल्यानंतर ठेवलं स्टेटस अन् प्रवाशांना दिला महत्वाचा संदेश

SCROLL FOR NEXT