Ajit pawar and sharad pawar meeting SaamTv
Video

Ajit Pawar - Sharad Pawar : मंचावर शेजारी बसायचं टाळलं, मात्र नंतर केली बंद दाराआड चर्चा; काका-पुतण्याचं नेमकं चाललंय काय? | VIDEO

Ajit Pawar - Sharad Pawar Meeting : पुण्यातल्या एका कार्यक्रमात आज अजित पवार आणि शरद पवार यांची एकत्र हजेरी लावली. यावेळी त्यांनी मंचावर एकमेकांच्या शेजारी बसायचं टाळलं असलं तरी कार्यक्रमानंतर दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे.

Saam Tv

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे. आज पुण्यात वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नेते जेवायला गेले, मात्र अजित पवार यांनी थेट शरद पवार यांचं कार्यालय गाठलं. दोघांमध्ये त्यानंतर १० मिनिटं चर्चा देखील झाली. यावेळी शरद पवार यांच्या कार्यालयात काका पुतण्या हे दोघंच उपस्थित होते. तर दिलीप वळसे पाटील आणि समरजित घाटगे मात्र बाहेर वेटिंगवर थांबलेले होते. चर्चा केल्यानंतर शरद पवार यांच्या केबिनमधून बाहेर पडतानाचा अजित पवार यांचा एक्सक्ल्यूझिव व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

एकीकडे याच कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर शेजारी शेजारी बैठक व्यवस्था असताना अजित पवार यांनी शरद पवारांच्या शेजारी बसायचं टाळलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या असतानाच कार्यक्रमानंतर मात्र अजित पवारांनी अशाप्रकारे जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याने या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यावरून देखील आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्लँकेट्स न धुता कशी स्वच्छ करावीत? सोप्या ट्रिक्सनं कुबट वास होईल गायब

Maharashtra News Live Update: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत अजित पवार गटाची बाजी; ४ उमेदवार विजयी

देशात आंदोलनं का होतायत? CJP ला पाठिंबा का मिळतोय? तुषार गांधींनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Bike Air Filter: बाईकचा एअर फिल्टर किती किलोमीटर्सनंतर बदलावा?

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

SCROLL FOR NEXT