Shiv Sena city chief Nana Bhangire hands over alleged bogus voters to police during Pune civic polls. Saam tv
Video

पुण्यात १ हजार बोगस मतदार आणले? कुणी केला गंभीर आरोप? राजकीय वर्तुळात खळबळ

Allegations Of Bogus Voters In Pune Municipal Elections: पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग 41 मध्ये बोगस मतदार पकडल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक 41 मध्ये बोगस मतदार पकडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी या बोगस मतदारांना पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

नाना भानगिरे यांनी आरोप केला आहे की, जवळपास एक ते दीड हजार बोगस मतदारांना वेगवेगळ्या जिल्ह्यांतून पुण्यात आणण्यात आले होते. यापैकी काही मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केल्याचाही संशय शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. हा प्रकार लोकशाहीच्या प्रक्रियेवर घाला घालणारा असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. या प्रकरणात संबंधित बोगस मतदारांना पुण्यात आणण्यामागे प्रभाग क्रमांक 41 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, निवडणूक आयोगाकडेही लेखी तक्रार करण्यात आल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Famous Couple : "प्रेमाला हळदीचा रंग लागला..."; प्रसिद्ध मराठी जोडपं लवकरच अडकणार लग्न बंधनात, पाहा PHOTOS

Maharashtra Live News Update: शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा

अमेरिकेकडून 'कापूस'कोंडी! बांगलादेशला फक्त ० टक्के, तर भारतावर १८ टक्केंचे आयत शुल्क

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Pune Politics: पुण्यात भाजपकडून मोठी कारवाई, ६९ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

SCROLL FOR NEXT