Pune Municipal Corporation launches a pilot project to microchip stray dogs — a major step toward making the city rabies-free. Saam Tv
Video

Pune Municipal Corporation: २.५ लाख भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप! काय होणार बदल? VIDEO

Pune Pilot Project For Stray Dog: पुणे महापालिकेने शहरातील अडीच लाख भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमातून रेबीजमुक्त पुणे करण्यास आणि श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे.

Omkar Sonawane

पुण्यातील भटक्या श्वानांची संख्या अडीच लाखांहून अधिक असून या श्वानांना रेबीजमुक्त करण्यासाठी आणि त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आता पुणे महापालिकेने अनोखे पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वानांना मायक्रोचिप बसविण्यात येणार आहेत. राज्यातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प असून, याची सुरुवात या महिन्यापासून होत आहे.

पुण्यातील भटक्या श्वानांची गणना महापालिकेने मे २०२३ मध्ये केली होती. त्या वेळी शहरात १ लाख ७९ हजार ९४० श्वान आढळले होते. त्याआधी २०१८ मध्ये ही संख्या ३ लाख १५ हजार होती. त्यात पाच वर्षांत मोठी घट झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर महापालिकेत ३४ गावे समाविष्ट झाल्याने या गावांतील भटक्या श्वानांची त्यात भर पडली. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची एकूण संख्या सुमारे अडीच लाखांवर पोहोचली आहे. भटक्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वानांची नसबंदी करण्याची मोहीम सातत्याने राबविली जात आहे. याचबरोबर श्वानांना रेबीज प्रतिबंधक लसही दिली जात आहे. आता पशुवैद्यकीय विभागाने शहरातील श्वानांना मायक्रोचिप बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज पुणे दौरा, शाखा अध्यक्षांची घेणार बैठक

Famous Influencer Death : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं निधन; ३२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, नेमकं कारण काय?

Vande Bharat Express : देशात १८६ वंदे भारत एक्सप्रेस धावतात, महाराष्ट्रात संख्या किती? वाचा

Local Body Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागणार निर्बंध? जाणून घ्या

Horoscope 6 November: या राशींसाठी आजचा दिवस असेल खास, तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT