पुणे : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्यासाठीचं निवडणुकीचे चिन्ह जाहीर करण्यात आलाय. वसंत मोरे यांना रोड रोलर हे निवडणुकीचे चिन्ह जाहीर करण्यात आलं आहे. वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरे यांना पुण्यातून लोकसभेसाठी उमेदवारी दिली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करत वसंत मोरे यांनी वंचित मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अखेर निवडणूक आयोगाकडून त्यांना निवडणुकीचा चिन्ह जाहीर करण्यात आले. पुण्यात लोकसभेसाठी तिहेरी लढत पाहायला मिळतेय. मविआकडून रवींद्र धंगेकर, महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आणि वंचितकडून वसंत मोरे यांच्या लढत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.