pune news  saam tv
Video

Pune News: पुण्यात पतीचा संताप अनावर, भांडणानंतर पत्नीची दुचाकी पेटवली|VIDEO

Husband burns wife’s scooter: पती-पत्नीतील वाद विकोपाला गेला आणि थेट हिंसेवर उतरला. पुण्यातील गणेश पेठ भागात रागाच्या भरात पतीने पत्नीची दुचाकी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Omkar Sonawane

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे: पती पत्नी मधील भांडणाचे अनेक प्रकार समोर येतात आता असाच एक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात पतीने दुचाकी पेटवून दिल्याचा प्रकार घडलाय. पुण्यातील गणेश पेठेत शुक्रवारी सकाळी ९ वाजता हा सगळा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती पत्नी वेगवेगळे राहत असून ते मुळचे कोंढव्यात राहणारे आहेत. महिला गणेश पेठेतील भावाकडे आली होती. सकाळी तिचा पतीही तेथे आला. त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा राग सहन न झाल्याने पतीने थेट दुचाकी पेटवून दिली. ही सर्व घटना सी सी टिव्ही मध्ये कैद झाली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT