VIDEO: Pune हिट अँड रन घटनेची Mumbai मध्ये पुनरावृत्ती Saam TV
Video

VIDEO: Pune हिट अँड रन घटनेची Mumbai मध्ये पुनरावृत्ती, भरधाव टेम्पोने दोन सायकलस्वारांना उडवले

Andheri Hit And Run News: मुंबईच्या अंधेरीमध्ये भरधाव पिकअप टेम्पोने दोन सायकल स्वारांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील हिट अँड रन ची घटना ताजी असतानाच मुंबईच्या अंधेरीमधील उड्डाण पुलावर देखील अशाप्रकारची घटना घडली आहे. अंधेरी उड्डाणपुलावरून सायकल वरून जाणाऱ्या दोन महाविद्यालयीन तरुणांना भरधाव वेगात असलेल्या पिकअप टेम्पो ट्रकने उडवल्याची घटना घडली आहे. यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी टेम्पो ट्रक चालक धनंजय राय याला परेल येथून अटक केली आहे. या अपघातात विवेक यादव 18 वर्षे तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. तर अमन यादव हा 19 वर्षे तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी टेम्पो ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: जालन्यातील परतुर तालुक्यातील वाहेगाव श्रीष्टी परिसरात ढगफुटी

Maharashtra Rain Update : छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत ढगफुटी; अनेकांचे संसार रस्त्यावर, बळीराजाच्या डोळ्यातही अश्रू,VIDEO

UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं; VIDEO

'सातपुडा'वरून अंजली दमानियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस | VIDEO

Stray Dogs: जगात सर्वाधिक कुत्रे कोणत्या देशात? टॉप १० मध्ये भारत कुठे?

SCROLL FOR NEXT