Pune Drugs Video: पुण्यातील हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी, सुष्मा अंधारेंची EXCLUSIVE प्रतिक्रिया Saam TV
Video

Pune Drugs Video: पुण्यातील हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी, सुष्मा अंधारेंची EXCLUSIVE प्रतिक्रिया

Sushma Andhare On Pune Drugs: पुण्यात बाथरुम मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत सुष्मा अंधारेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेलमधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओ मध्ये लेट नाईट पार्टी नंतर बाथरुम मध्ये ड्रग्ज सेवन करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या बातमीनंतर पुण्यातील हॉटेलवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर सुष्मा अंधारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पुण्यामध्ये ड्रगजचा व्यापार पुर्ण पणे थांबलेला नाही असं त्या म्हणाल्या. ठाकरे गटाच्या नेत्या सुष्मा अंधारे यांच्याकडून पैश्यांसंदर्भात एक ट्विट करण्यात आलं होतं त्यावर शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली होती. आता सुष्मा अंधारे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या पुण्यातील ड्रग्जच्या या व्हिडीओवर Exise Minister म्हणून शंभुराज देसाई Shambhuraj Desai आणि पुणे पोलीस जे त्यांच्यासाठी काम करतात,यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं पाहिजे. असं म्हणत सुष्मा अंधारे यांनी शंभुराज देसाईंवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आखाती देशातील युद्धाचा जालन्यातील स्टील उद्योगाला फटका

भाजप खासदाराच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान भिमाशंकरमध्ये आग

बाजारात आला बजेट फ्रेंडली फोन! दमदार बॅटरी, शानदार कॅमेरा अन् बरंच काही...,जाणून घ्या Samsung Galaxy M17e 5G चे फीचर्स

शहीद संतोष जगदाळेंची कन्या झाली सरकारी अधिकारी; कोणत्या पदावर झाली नियुक्ती?

Congress MP: राजीनामा देण्याच्या २४ तासाच्या आत काँग्रेस खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश; राज्यातील राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT