Bharat Jadhav
मुलाच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर विविध विधी केले जातात. गर्भधारणेपासून ते मुलाच्या जन्मानंतरच्या काळापर्यंत एकूण नऊ संस्कार पार पाडले जातात; त्यापैकी 'चूडाकर्म' म्हणजेच डोक्यावरील केस काढण्याचा विधी 'जावळ' याला विशेष महत्त्व आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, हा एक गैरसमज आहे. नव्याने पालक बनलेले अनेकजण 'मुंडन' (केस काढण्याचा विधी) करण्यापूर्वी डॉक्टरांना एकच प्रश्न विचारतात, मुलाचे मुंडन करण्यासाठी योग्य वय कोणते? बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष यादव यांनी एका व्हिडिओद्वारे या विषयावर माहिती दिली आहे.
डॉ. संतोष यादव यांनी सांगितले की, त्यांनी अनेक पुस्तकांमध्ये या प्रश्नाचे उत्तर नाहीये. जावळ काढण्याचं वय कोणतं चांगलं यावरून त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोल घेतला. याला प्रतिसाद म्हणून, १५ टक्के लोकांनी आपल्या मुलाचा जावळ विधी सहा महिन्यांच्या वयापूर्वी, २७ टक्के लोकांनी ६ ते १२ महिन्यांच्या दरम्यान, २८ टक्के लोकांनी १२ ते १८ महिन्यांच्या दरम्यान आणि ३० टक्के लोकांनी १८ महिन्यांनंतर योग असल्याचं म्हटलं.
जन्माच्या वेळी बाळाच्या डोक्यावर असलेले केस हे त्याच्या मागील जन्मातील अवशेष आणि अशुद्धतेचे प्रतीक मानले जातात. 'जावळ' काढणं हा एक संस्कार असून हे मागील जन्म सोडून नव्या आयुष्यातील एका नवीन पर्वाची सुरुवात करण्याचे प्रतीक आहे. यासह अशीही एक धारणा आहे की जन्माच्या वेळचे केस काढून टाकल्याने बाळाचे केस पुन्हा अधिक जाड, दाट आणि एकसारखे वाढतात.
डॉक्टरांच्या मते, 'मुंडन' विधी सांस्कृतिक समजुतींमुळे केला जातो, असे मानले जाते की केस काढल्यानंतर एका नवीन आयुष्याची सुरुवात होते. तसेच या प्रथेमुळे केसांची वाढ चांगली होते, अशीही एक धारणा आहे. मात्र, डॉक्टर या गोष्टींना केवळ गैरसमज मानतात.
लहान मुलांची टाळू अत्यंत नाजूक असते आणि केस काढण्यासाठी वस्तऱ्याचा (ब्लेडचा) वापर केला जातो. त्यामुळे, काहीतरी अघटित घडेल की काय, अशी चिंता अनेक पालकांना वाटते. डॉ. यादव यांच्या मते, त्यांच्या १५ वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत त्यांना जावळ काढण्यात एकाच समस्येचा सामना करावा लागला आहे, ते म्हणजे मुलाच्या टाळूवर ओरखडा पडण्याचा किंवा कापले जाण्याचा धोका.
मुंडण झाल्यानंतर बाळाच्या डोक्याला थंडावा मिळण्यासाठी संपूर्ण डोक्यावर चंदनाचा लेप लावण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तसेच, काही ठिकाणी कापले गेले असल्यास तिथे अँटीसेप्टिक क्रीम लावावे.
मुलाचा 'जावळ' विधी कोणत्या वयात करावा? याचे उत्तर देताना डॉक्टर म्हणतात की, हे तुमच्या सांस्कृतिक प्रथेनुसार हा विधी करावा. फक्त एवढी काळजी घ्या की, केस काढणारी व्यक्ती अनुभवी असावी आणि तुमच्याकडे अँटीसेप्टिक क्रीम उपलब्ध असावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.