Pune crime news today Saam
Video

पुण्यात थरार! भिडे पुलाजवळ तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, नेमकं कारण काय ?

Pune crime news today : पुण्यातील भिडे पुलाजवळ एका अज्ञात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

पुण्यातील नदीपात्रातील भिडे पुलाजवळ एका अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

धारदार शस्त्राने वार करून आणि डोक्यात दगड घालून ही हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू केला आहे. अद्याप मृत तरुणाची ओळख पटलेली नाही.

पुराव्यांच्या संकलनासाठी फॉरेन्सिक टीम पाचारण करण्यात आली असून, ती घटनास्थळी तपासणी करत आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली की अन्य कोणत्या कारणातून, याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT