Pune Crime News AI Image
Video

Pune Crime : स्वारगेटनंतर आणखी एक धक्कादायक घटना, सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणीला पाहून ड्रायव्हरचं नको ते कृत्य

Pune Crime News : स्वारगेटमध्ये शिवशाहीत २६ वर्षीय तरूणीसोबत बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेकडून पाहून ड्रायव्हरने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली.

Namdeo Kumbhar

Pune Crime News Update : स्वारगेट बलात्कार प्रकरण ताजं असताना पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात कॅब चालकाकडून महिलेसोबत छेडछाड करण्यात आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात कॅब चालकाने महिला सॉफ्टवेअर इंजिनीयर महिलेची छेडछाड केली. कॅब चालकाला पोलिसांनी केली अटक

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील एका कंपनीमध्ये ही महिला काम करते. तेथून तिने घरी जाण्यासाठी कॅब बुक केली होती. संगमवाडी रोडवर बुक केलेली कॅब तिला घेण्यासाठी आली. महिला कॅबमध्ये बसल्यानंतर चालकाने गाडीतील आरसा महिलेकडे वळवला. आरशामध्ये महिलेकडे वाईट नजरेने पाहू लागला आणि इशारे करू लागला. महिलेने कॅब अर्ध्या रस्त्यात थांबवण्यास चालकाला सांगितले. कॅबमधून उतरल्यानंतर पीडित महिलेने थेट पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ सुमित कुमार या चालकाला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singer Home Attack: प्रसिद्ध गायकाच्या घरावर गोळीबार; मोठा खुलासा करत म्हणाला, 'सलमान खानसोबत मैत्री...'

Maharashtra News Live Update: जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट गडद

नामांकित कंपनीच्या संचालकाने आयुष्य संपवलं, औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! ₹2 लाख जमा करा, फक्त इतक्या वर्षात मिळेल ₹89,990 व्याज; सरकारची गॅरंटी

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा २० वर्षानंतर निकाल लागला, पद्मसिंह पाटील निर्दोष, ओमराजेंना धक्का; कोर्टात नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT