Gaurav Ahuja News 
Video

Pune : माजुरड्या गौरव आहुजाची गुन्हेगारी हिस्ट्री, जुगार आणि अपहरणाचे गुन्हे

Gaurav Ahuja News : गौरव अहुजा क्रिकेट बेटिंग खेळणाऱ्या टोळीचा सदस्य आहे. बेटिंगच्या व्यसनात गौरव याने अनेक तरूणांना कर्जबाजारी केलेय. पैशासाठी अनेकांचे अपहरण केल्याचेही समोर आले आहे.

Namdeo Kumbhar

Pune BMW News : पुण्यात कुकृत्य करणाऱ्या गौरव आहुजा याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची वैदकीय चाचणी पूर्ण झाली असून आज त्याला दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. गौरव अहुजा आणि त्याच्या बापाची गुन्हेगारी हिस्ट्री समोर आली आहे. गौरव अहुजा याच्यावर जुगार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

गौरव अहुजा क्रिकेट बेटिंग खेळणाऱ्या टोळीचा सदस्य आहे. बेटिंगच्या व्यसनात गौरव याने अनेक तरूणांना कर्जबाजारी केलेय. पैशासाठी अनेकांचे अपहरण केल्याचेही समोर आले आहे. गौरव २० वर्षांचा असताना त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पुण्यातील गुंड सचिन पोटेच्या नेतृत्वात गौरव बेटिंग करत होता. गौरव याने कॉलेजमधील अनेकांना बेटिंगच्या जाळ्यात ओढून कर्जबाजारी केलेय.

गौरव आहुजाचं ससून रूग्णालयामध्ये मेडिकल झालं, त्यानंतर त्याला येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. येरवडा पोलिसांनी गौरव आहुजाला अटक दाखवली आहे. दुपारी करणार कोर्टासमोर हजर आहे. गौरव अहुजाची गाडी ही पुणे पोलिसांकडून जप्त केली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

Chhattisgarh : ३६ किल्ल्यांची भूमी छत्तीसगड! भारतात लपलेला ऐतिहासिक खजिना, तुम्ही कोण-कोणते किल्ले पाहिलात?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Good News : LPG दरात झाली मोठी घट, ऑटो चालकांना मोठा दिलासा, पाहा आता किती रूपयांना मिळणार?

पांढरे केस होतील काळे! तुरटी आणि आवळ्याचा 'हा' सोपा उपाय ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT