Stimulant drugs discovered at Chhatrapati Shivaji Maharaj International Sports Complex, Balewadi, Pune, causing uproar in sports community. Saam Tv
Video

पुण्यात क्रीडा संकुलमध्ये डोपिंग सदृश इंजेक्शन आढळले; क्रीडा विश्वात खळबळ|VIDEO

Doping Injection Discovered In Pune Sport: पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात डोपिंग सदृश इंजेक्शन आणि उत्तेजनात्मक औषध आढळले.

Omkar Sonawane

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रेमींसाठी हक्काचं माहेर घर असलेल्या पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल परिसरामध्ये डोपिंग सदृश्य इंजेक्शन आणि औषध आढळून आली आहेत. क्रीडा संकुलात व्यामासाठी गेलेल्या एका तरुणाला ही उत्तेजनात्मक औषध आढळून आली आहेत. त्यामुळे क्रीडा विश्वात एकूणच मोठी खळबळ निर्माण झाली आहे. बालेवाडी येथील क्रीडा संकुलात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या क्रीडा स्पर्धा होत असतात, त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडू सराव करत असतात. त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचे उत्तेजनात्मक औषध आढळून आल्याने एकूणच क्रीडा विश्वात खळबळ निर्माण झाली आहे. याच परिसरामध्ये राज्याचं क्रीडा आयुक्तालांच कार्यालय देखील आहे तसेच चोख सुरक्षा व्यवस्था देखील या परिसरात कार्यरत असते . असं असताना देखील काही खेळाडू उत्तेजनात्मक औषधाचा वापर करत असल्याने क्रीडा संकुलातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि राज्यातील क्रीडा आयुक्तांच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

Heart Attack : सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक, संशोधनातून नेमकं काय समोर आलं? VIDEO

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

Vice President Election: इंडिया आघाडीची मतं फुटली; कोणी केली क्रॉस व्होटींग, कुठे गेम फिरला?

SCROLL FOR NEXT