Manasvi Choudhary
सब्जा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला ऊर्जा मिळावी यासाठी सब्जा ड्रिंक पितात.
मात्र तुम्हाला माहितीये का? वजन कमी करण्यासाठी देखील सब्जा ड्रिंक पिऊ शकता.
घरच्या घरी तुम्ही सब्जा स्पेशल ड्रिंक बनवा. हे ड्रिंक नियमित प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
ड्रिंक बनवण्यासाठी सर्वातआधी एका ग्लासमध्ये सब्जा आणि पाणी रात्रभर भिजत ठेवा.
सकाळी गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी घ्या. नंतर त्यात तेजपत्ता घाला आणि पाणी उकळून घ्या.
एका ग्लासमध्ये भिजवलेला सब्जा आणि तेजपत्ता पाणी मिक्स करा. नंतर त्यात लिंबाचा रस आणि मध घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.
आठवडाभर म्हणजेच ७ दिवस हे ड्रिंक प्यायल्यास तुम्हाला फरक दिसेल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.