Union Minister Prataprao Jadhav addressing media in Jalna on Maratha Reservation issue Saam Tv
Video

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच मोठं विधान म्हणाले... VIDEO

Prataprao Jadhav Statement On Maratha And OBC Reservation: मराठा आरक्षणावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मोठं विधान केल आहे. ओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे ते म्हणाले. तसेच संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

जालना जिल्हा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआर मुळे ओबीसी समाजात अस्वस्थता आहे. मात्र महायुती सरकारची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट आहे की ओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. आज दोन्ही समाजात गैरसमज पसरवले जात आहेत. मराठ्यांना सांगितले जाते की यातून तुम्हाला काही मिळणार नाही, तर ओबीसींना सांगितले जाते की तुमचा वाटा हिसकावला जात आहे. पण असे होणार नाही. कालच मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केले की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना जाधव म्हणाले, संजय राऊत हा सकाळचा भोंगा आहे. सकाळी आरोप करायचे आणि दिवसभर टीव्हीवर दिसायचे एवढाच त्यांचा धंदा आहे. राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली तेव्हा उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा सल्ला राऊतांनी का दिला नाही? त्या वेळी त्यांचा स्वाभिमान का जागा झाला नाही? त्यांचा पक्ष संपत चालला असून, तो वाचवण्यासाठी त्यांनी शक्ती खर्च करावी. मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल.

दरम्यान, मिलिंद देवरा यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राविषयी विचारले असता प्रतापराव जाधव म्हणाले, मुंबईमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र अशा आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होता कामा नये आणि मालमत्तेचे नुकसान होता कामा नये. देवरा यांनी SOP च्या अंमलबजावणीची मागणी केली आहे, पण त्याचा विपर्यास केला जात आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhel Recipe: तोंडाला पाणी सुटलं ना? मग आजच बनवा ही चटपटीत 'ओली भेळ'

Moti jewellery Designs: अस्सल पारंपारिक सौंदर्य येईल खुलून, मोत्यांच्या दागिन्यांचे 6 ट्रेडिंग आणि युनिक पॅटर्न

Pune Congress: भाजपच्या मांडीला मांडी लावणाऱ्यांना तिकिट नको; काँग्रेस उमेदवार मुलाखतीवेळी वाद

माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिस मुंबईला रवाना|VIDEO

Skin Care : मेकअप काढल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या टिप्स

SCROLL FOR NEXT