VIDEO: Ambernath मधील Waldhuni नदीला प्रदूषणाचा विळखा, MIDC मधून सांडपाणी Saam TV
Video

VIDEO: Ambernath मधील Waldhuni नदीला प्रदूषणाचा विळखा, MIDC मधून सांडपाणी

Ambernath Waldhuni River News: बरनाथच्या वालधुनी नदीवर प्रदूषणाचा फेस,प्राचीन शिवमंदिराच्या बाहेर नदीवर आला फेस,नदीत एमआयडीसीतून सोडलं जातं रासायनिक सांडपाणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अंबरनाथ: वालधुनी नदीच्या प्रवाहावर पांढरा फेस आल्याचं पाहायला मिळत आहे. या नदीत एमआयडीसीतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे हा फेस आल्याचं बोललं जात आहे. वालधुनी नदी अंबरनाथच्या तावलीच्या डोंगरातून उगम पावते. या नदीच्या प्रवाहावर पांढऱ्या रंगाचा फेस आलाय. यापूर्वीही असे प्रकार अनेकदा घडले असून एमआयडीसीतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे वालधुनी नदीचं रासायनिक नाल्यात रूपांतर झालं होतं. मात्र अंबरनाथ पालिकेनं मध्यंतरी सुरू केलेल्या वालधुनी पुनरुज्जीवन मोहिमेद्वारे नदीतलं प्रदूषण रोखून नदीची स्वच्छता करण्यात आली होती. तर प्रदूषणकारी कंपन्यांना नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा नदीच्या प्रवाहावर पांढरा फेस आल्याने या नदीत रासायनिक प्रदूषण झाल्याचं बोललं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT