BJP Women’s Wing led by Chitra Wagh protesting in Mumbai against Congress over viral AI video of PM Modi’s mother. Saam Tv
Video

पंतप्रधानांच्या मातोश्रींच्या एआय व्हिडिओवरून भाजपचा संताप; महिला मोर्चाचा काँग्रेसविरोधात हल्लाबोल|VIDEO

Political Storm Erupts After AI Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा एआय व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वादंग निर्माण झाला आहे. भाजप महिला मोर्चाने काँग्रेसविरोधात मुंबईत आणि राज्यभरात जोरदार आंदोलन छेडले.

Omkar Sonawane

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांचा एआय प्रणालीद्वारे व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्यात आल्याने राजकीय वादंग पेटले आहे. काँग्रेसकडून मोदींच्या मातोश्रींचा अवमान झाल्याचा आरोप भाजपने करत संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी भाजप महिला मोर्चाकडून राज्यभर जोरदार निदर्शने करण्यात आली. मुंबईत आमदार चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चाने काँग्रेसविरोधात निषेध आंदोलन छेडले.

यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी करत तीव्र रोष व्यक्त केला. दरम्यान, अमरावतीतही राजकमल चौकात भाजपा महिला मोर्चाने आंदोलन करत काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींच्या सन्मानाला धक्का पोहोचवण्याचा हा प्रकार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असून काँग्रेसने अशा नीच राजकारणाचा अवलंब केल्याचा आरोप करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : जोडीदाराशी भांडण होणार; ५ राशींचे लोक घरगुती गोष्टीत अडकून पडणार, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र

Kalyan Street Dogs : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; एकाच दिवशी ३५ जणांना घेतला चावा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Shocking ! भेटायला बोलून मुलाचे कपडे उतरवले; नंतर बनवला अश्लील व्हिडिओ मग..., घटना वाचून उडेल थरकाप

हिंगोलीत भर बाजारपेठेत तरुणावर चाकू हल्ला, पाहा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT